Home Breaking News Ghugus city@ news • वेकोलीत सिलेंडरचा स्फोट ; 4 कामगार गंभीर जखमी!...

Ghugus city@ news • वेकोलीत सिलेंडरचा स्फोट ; 4 कामगार गंभीर जखमी! जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले

113

Ghugus city@ news
• वेकोलीत सिलेंडरचा स्फोट ; 4 कामगार गंभीर जखमी!
जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

घुग्घूस -वेकोलीच्या जिओसी कोळसा खाणीत आज सकाळच्या पाळीत काही कामगार कोल हँडलिंग प्लांट बंकर मध्ये ब्रेक डाऊनचे काम करीत असताना अचानक हायड्रोलिक सिलेंडरचा स्फोट होऊन त्या ठिकाणी काम करणारे चार कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडल्याचे वृत्त आहे.
या घटनेतील जखमी झालेल्या कामगारांचे नाव प्रभानंद कटकुलवार, रेखचंद ताजने, मारोती वनकर व विजय झाडे असे असल्याचे सांगितल्या जाते.दरम्यान जखमींना तातडीने राजीव रतन दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे . सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.सदरहु घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलिस राजीव रतन दवाखान्यात दाखल झाले असल्याचे समजते.

वेकोलीच्या सुरक्षा अभावी तसेच नायट्रोजन सिलेंडर ऐवजी हायड्रोलिक सिलेंडरचा वापर केल्यामुळे सदरहु घटना घडली असल्याची चर्चा ऐकिवात आहे. नायट्रोजन गॅस पेक्षा हायड्रोलिक गॅसची किंमत स्वस्त असल्यामुळे ह्या गॅसचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.