Home Breaking News Chandrapur dist@ news •ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारधी...

Chandrapur dist@ news •ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारधी यांची नियुक्ती

94

Chandrapur dist@ news
•ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारधी यांची नियुक्ती

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी नुकतीच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख व चंद्रपुर सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीचे माजी अशासकीय सदस्य संतोष पारखी यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

संपूर्ण भारतात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती कार्यरत असून ग्राहक संरक्षण कल्याण हक्क कायदा 1986/2019 अंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, सहकारी क्षेत्रातील कामे करण्यासाठी तसेच ग्राहक पद्धती, कायदेविषयक ज्ञान, सामाजिक कार्य व स्वतःची इच्छाशक्ती लक्षात घेवून पारखी यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

सदरहु निवड ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या मार्गदर्शिका रणरागिनी राष्ट्रीय उपाध्यक्ष आशाताई पाटील व नागभीड तहसील अध्यक्ष गिरीश नवघड़े यांच्या शिफारशीनुसार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय सचिव हर्षदजी गायधनी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मंगेशजी मोहिते यांच्या संमतीने करण्यात आली असल्याचे संतोष पारधी यांनी सांगितले.