Home Breaking News Chandrapur dist@ news • सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका गझलनंदा यांच्या “सावली अंबराची...

Chandrapur dist@ news • सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका गझलनंदा यांच्या “सावली अंबराची “या गझल संग्रहाला गझल सन्मान पुरस्कार जाहीर! • साहित्य क्षेत्रातील मंडळींनी केले सुनंदा पाटील यांचे अभिनंदन!

148

Chandrapur dist@ news
• सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका गझलनंदा यांच्या “सावली अंबराची “या गझल संग्रहाला गझल सन्मान पुरस्कार जाहीर!
• साहित्य क्षेत्रातील मंडळींनी केले सुनंदा पाटील यांचे अभिनंदन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:फक्त कवितेसाठी वाहिलेल्या आणि भारतभर सर्वत्र चर्चेत राहिलेला “कवितेचे घर ” शेगाव या संस्थेचा समग्र मराठी गझलेसाठीचा बापुरावजी पेटकर स्मृतीगझल सन्मान 2023 चा पुरस्कार गझलनंदा यांच्या सावली अंबराची या गझल संग्रहाला नुकताच जाहीर झाला आहे. हा सन्मान येत्या ८ आक्टोबर २०२३ रोजी स्व . बापुरावजी पेटकर स्मृती दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते शेगाव येथे प्रदान करण्यात येणार असून आयोजकांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका तथा सुपरिचित साहित्यिक सुनंदा पाटील यांना तसे कळविले आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण गझलसंग्रहाला या पूर्वीही काही सन्मान प्राप्त झाले आहेत . यात ” एका तेजस्वी लेखणीचा प्रवास – शिरीष कुलकर्णी पुणे , पं .भिमराव पांचाळे यांची पाठराखण , प्रस्तावना आणि “गझलनंदाच्या गझलेतील स्त्री उद्गार ” हे विशेष लेख आहेत . तसेच जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर पासून तर अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा आणि प्रतिक्रिया यात आहेत विशेष म्हणजे १०० गझलांसह ” मराठी गझल – स्वयंअध्ययनाची अंकलिपी ” हा नवीन गझल लिहिणाऱ्या हातांसाठी एक दीर्घ मार्गदर्शनपर लेखाचा यात समावेश आहे. शिवाय गझलनंदा यांचे खास मनोगत आहे.

गझलकारा गझलनंदा यांनी सन्मानासाठी आयोजकांचे आभार देखील मानले आहेत. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे संयोजिका रंज्जू मोडक सहसंयोजिका वर्षा कोंगरे,कु.किरण साळवी यांच्या सह महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.