Home Breaking News नागपूरच्या सरोज अंदनकर यांचा आज वाढदिवस! नागपूरात होतोय थाटात साजरा !...

नागपूरच्या सरोज अंदनकर यांचा आज वाढदिवस! नागपूरात होतोय थाटात साजरा ! •सुनंदा पाटील यांनी दिल्या सरोजला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

109

• नागपूरच्या सरोज अंदनकर यांचा आज वाढदिवस! नागपूरात होतोय थाटात साजरा !
•सुनंदा पाटील यांनी दिल्या सरोजला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

नागपूर : चि.सौ. सरोज अंदनकर नागपूर
माझी लाडकी धाकटी बहीण बाळा ,आज तुझा वाढदिवस आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावरचा
अगदी लहाणपणापासून तुझ्यातला कलावंत आम्ही बघत होतो. आणि वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी तुला पेटीचा सूर गवसला. तुझी इवली इवली बोटं जेव्हा पेटीवरून फिरायची , ते दृश्य बघण्यासारखं असायचं .

पुढे स्विमिंग , सायकल चालवणं या गोष्टी छोट्या गावात राहूनही तू आत्मसात केल्यास. रांगोळीत तर तुझा हातखंडाच . शाळेच्या किंवा इतर कुठल्या स्पर्धा अशा नसायच्या की , ज्यात तुला पुरस्कार नाही.
बाबांनी केलेल्या गणपतीचे रंग आपण सर्व भावंडं मिळून पूर्ण करायचो . तू वेगवेगळी चित्रं काढून रंगवायचीस. या साऱ्या आठवणी ताज्या आहेत.
वयापरत्वे एका मुलीला अवगत असायला हवं ते म्हणजे स्वैंपाकघराशी नातं . ते तर छानच जुळलं . तुझ्या हातची चव आजही तशीच आहे.

आज साहित्य क्षेत्रात तू खूप मोठी भरारी घेतली आहेस. साहित्याच्या अनेक क्षेत्रांत तुझा वावर आहे. काव्याच्या क्षेत्रात तू खूप मोठी मजल मारली आहेस. विविध काव्यप्रकार तू सहज हाताळतेस . “देवाचिये द्वारी ” नंतर आता तर तुझा दुसरा ( कैवल्य – आरती संग्रह ) काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. खरंच खूप कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो तुझा.

नात्यातले संबंध तू जपतेसंच . पण समुहांवर विविध नाती आकाराला आली आहेत. सर्वांची लाडकी माई आहेस तू .

आज सारेजण तुझा बासष्ठावा वाढदिवस आनंदाने साजरा करीत आहेत. हाच आनंद पुढील आयुष्यात तुला मिळत राहो.
वयाच्या वडीलकीच्या नात्यानं एवढंच म्हणेन की , तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. आणि आकांक्षांना आकाश ठेंगणे पडू दे .
तुझ्या निरामय दीर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते.

पुन्हा एकदा . बासष्ठाव्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद बाळा .

तुझी ताई
🔶◽सुनंदा पाटील🔶 ◽◽◽◽गझलनंदा 🔶◽