Home Breaking News Mul taluka @news •तलावात उडी घेऊन तरुणाने जीवनयात्रा संपवली !

Mul taluka @news •तलावात उडी घेऊन तरुणाने जीवनयात्रा संपवली !

491

Mul taluka @news

•तलावात उडी घेऊन तरुणाने जीवनयात्रा संपवली !

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर: जिल्ह्यातील मूल येथील तलावात उडी मारुन एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली.
स्थानिक बस स्थानक परिसरात असलेल्या तलावात आज रविवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान उपरोक्त घटना घडली. त्या युवकाचे नांव गुलाब मारोती मंकीवार असून तो सावली तालुक्यातील चारगांव येथील रहिवाशी असल्याचे समजते.
त्याचे वय अवघे 28 वर्षांचे आहे.सदरहु घटनेतील मृतक हा येथील साईश्रद्धा रेस्टॉरंट मध्ये काम करीत होता .तो मूल शहरात काही दिवसांपासून किरायाने राहत होता. घरगुती वाद होवून रागाच्या भरात त्याने आत्महत्या केल्याची चर्चा शहरात आहे. मृतकाला पत्नी, दोन लहान मुली, व आई असा परिवार आहे.