Home Breaking News Chandrapur dist@ news •फ्रेंड्स ग्रुप तर्फे महात्मा गांधी जयंती लोहारा...

Chandrapur dist@ news •फ्रेंड्स ग्रुप तर्फे महात्मा गांधी जयंती लोहारा येथे उत्सवात साजरी.

206

Chandrapur dist@ news

•फ्रेंड्स ग्रुप तर्फे महात्मा गांधी जयंती लोहारा येथे उत्सवात साजरी.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर :२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जयंती निमित्य लोहारा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळेस शाळेतील मुख्याध्यापक शीला धुळे यांचा अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बाहदूर शास्त्री यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणुन विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, फ्रेंड्स चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा सरिता मालू, रंजना नागतोडे, हेमा व्यास शुभम गोविंदवार इत्यादींची उपस्थिती होती. चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणुन मिथिलेश काहिलकर याने काम बघितले. विजेत्या स्पर्धकांना तसेच इतर विधर्थ्यांना फ्रेंड ग्रुप तर्फे ११० ड्रेस वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिक्षिका सुनीता धकाते, कृतिका बुरघाटे, माया खणके यांची उपस्थिती होती.