Home Breaking News Chandrapur dist@ news • शेतकऱ्यांना व सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणारा बहुचर्चित...

Chandrapur dist@ news • शेतकऱ्यांना व सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणारा बहुचर्चित लाचखोर तलाठी राजू रग्गड अखेर निलंबित! •शेतजमीनीचा फेरफार घेण्यासाठी हवी होती”रग्गडला”लाच ! •चंद्रपूर ACB ने दिला दणका! •चिमूरच्या एसडीओंनी केले निलंबित

288

Chandrapur dist@ news
• शेतकऱ्यांना व सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणारा बहुचर्चित लाचखोर तलाठी राजू रग्गड अखेर निलंबित! •शेतजमीनीचा फेरफार घेण्यासाठी हवी होती”रग्गडला”लाच !
•चंद्रपूर ACB ने दिला दणका!
•चिमूरच्या एसडीओंनी केले निलंबित

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर:नोंदणीकृत फेरफार रुजू करण्यासाठी एक दोन हजारांची नव्हे तर चक्क १५ हजार रुपयांची लाच मागणा-या एका लाचखोर तलाठ्यास व मंडळ अधिकाऱ्यास चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिण्या पूर्वी रंगेहात पकडले होते .

याच प्रकरणातील बहुचर्चित लाचखोर तलाठी राजू रग्गड यांना चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी तातडीने निलंबित करुन त्या तलाठ्याचे मुख्यालय सिंदेवाही तहसिल कार्यालय ठेवण्यात आले असल्याचे
ताजे वृत्त आहे.दरम्यान या निलंबन आदेशाची एक प्रत संबंधित तलाठ्यास पाठविण्यात आलेली आहे.कायद्याने लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे याची पुरेपूर कल्पना असतांना देखिल शासनाचा महिण्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलाणा-या या तलाठ्यास लाचेचा मोह टाळता आला नाही .शेवटी तो लाच घेताना चंद्रपूर एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला!राजू विठ्ठलराव रग्गड यांचे कडे अतिरिक्त अडेगांव देशमुख या गावाचा कार्यभार होता.

तक्रारदार हे सेवानिवृत्त कर्मचारी होते ते आपल्या परिवारासह अतिदुर्गम गडचिरोली भागात राहत होते.त्यांच्या कुटूंबातील शेतजमीन चिमूर तालुक्यातील अडेगांव देशमुख या गावी आहे.या शेतजमीनीवर काही नांवे समाविष्ठ होती. त्यांच्या आत्यांनी विनामोबदला लेख दुय्यम निबंधक कार्यालय चिमूर येथे त्यांना लिहून दिला होता.नंतर तक्रारदाराने तो लेख फेरफार करण्यासाठी विहीत नमुन्यात पटवा-याकडे सादर केला होता .पण पटवारी महाशय मात्र फेरफार करण्यासाठी सतत लाचेची मागणी करत होते .पटवा-याने या कामासाठी तब्बल १५ हजार रुपयांची मागणी केली.

पटवारी व तक्रारदार यांचेत सम्झौता होवून तो सौदा ११हजार रुपयांवर पक्का झाला.परंतु तक्रारदारास एव्हढी मोठी रक्कम देण्याची मुळातच इच्छा नव्हती. त्याने थेट चंद्रपूर गाठले व पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या विरोधात एसीबीच्या कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली.एसीबीच्या अधिका-यांनी व पथकांनी क्षणाचा विलंब न लावता सापळा रचला.चिमूरला लाचखोर पटवारी राजू रग्गड यांचे किरायाचे तलाठी कार्यालय आहे.

त्याच ठिकाणी चंद्रपूर लाचलूचपत पथकांनी यशस्वीपणे ही धडक कारवाई केली.रग्गड हे गेल्या ब-याच वर्षांपासून चिमूर उपविभागात पटवारी म्हणून कार्यरत आहे.दरम्यान लाचखोर तलाठी रग्गड व मंडळ अधिकारी यांचेवर उपरोक्त कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर,अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजूषा भोसले,चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील,एसीबी पथकातील कर्मचारी रोशन चांदेकर,संदेश वाघमारे,वैभव गाडगे ,पुष्पा काथोळे, सतिश शिडाम आदींनी यशस्वीरित्या केली होती.

शासनाचा महिण्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलून देखील राजू रग्गड शेतकरी व सर्व सामान्य जनतेस वेठीस धरत होता अशी चर्चा उपरोक्त घटने नंतर चिमूर तालुक्यातील जनतेत ऐकावयास मिळाली .