Home Breaking News Chandrapur dist@ news • राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा! •विजेत्यांना मिळणार पारितोषिके

Chandrapur dist@ news • राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा! •विजेत्यांना मिळणार पारितोषिके

57

Chandrapur dist@ news
• राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा!
•विजेत्यांना मिळणार पारितोषिके

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर: शिक्षक ध्येय आणि‌‌ आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२३’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.
अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी)
ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)
क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)
विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे ‘चित्रकला’ होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
गट अ चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
1. पतंग
2. फुलपाखरू
3. फुगा
४. फुलदाणी
गट ब चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
1. माझा आवडता पक्षी
2. माझी शाळा
3. निसर्ग चित्र
४. परी
गट क चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
1. माझा आवडता प्राणी
2. झेंडा वंदन
3. गावची जत्रा
४. माझा आवडता सण
चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या चित्राचा मोबाईलमध्ये एक छानसा फोटो काढायचा आहे. तो फोटो आम्हाला माहिती सह आमच्या
वरील सर्व माहिती व फोटो आपण 9623237135 या व्हाॅटसएप नंबरवर पाठवायचा आहे. रंगविलेले चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
तीनही गटातील उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके यांचा समावेश आहे.तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 51+ डिजिटल अंक व्हाॅट्सअप नंबरवर किंवा ई मेल वर पाठविण्यात येईल.