Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस नगर परिषदतर्फे ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ संदर्भात बैठक...

Ghugus city@ news • घुग्घुस नगर परिषदतर्फे ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ संदर्भात बैठक समारंभ

34

Ghugus city@ news
• घुग्घुस नगर परिषदतर्फे ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ संदर्भात बैठक समारंभ

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर:येथील नगर परिषद कार्यालयात गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ संदर्भात बैठक पार पडली.

मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार व सिटी मिशन प्रबंधक रोशनी तपासे बावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

योजनेचा लाभ पथ विक्रेते, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, चहा टपरी, पान टपरी, फेरीवाले, सिजनेबल व्यवसाय करणारे महिला बचत गट अशा विविध छोट्या व्यवसायीकांना मिळणार आहे व सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध होणार आहे.

प्रथम कर्ज १०,००० हजार रुपये ७% वार्षिक व्याज दराने, एका वर्षात प्रथम कर्जफेडी नंतर दुसरे कर्ज २०,००० हजार रुपये कर्ज एका वर्षात परतफेडी नंतर तिसरे कर्ज ५०,००० हजार रुपये पर्यंत मिळणार आहे.

लाभार्थ्यांना सेतू केंद्रातून अर्ज करावा लागणार आहे अप्रू होताच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. सरकारी बँक द्वारे कर्ज उपलब्ध होणार आहे.

त्यासाठी काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. जनजागृतीसाठी शहरात नगर परिषदेतर्फे बॅनर लावण्यात आले आहे. बँकांची बैठक घेण्यात आली असून बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास नगर परिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी नप. पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता सोनाली नागरगोजे, कर निरीक्षक अर्चना डिंगलवार, काँग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली,यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या नेत्या उषा आगदारी, संध्या जगताप, भारती सोदारी, काँग्रेस नेते सिनू गुडला, शहजाद शेख, कामगार नेते नरेंद्र नुने, सामाजिक कार्यकर्ता पंकज धोटे, मंदेश्वर पेंदोर, नप. चे हरी जोगी, रवींद्र गोहोकार, शंकर पचारे, मोसीम कुरेशी व छोटे दुकानदार उपस्थित होते.