Home Breaking News Ghugus city @news •घुग्घुस शहरातील नगरपरिषदेच्या रोजदारी कर्मचाऱ्यांला शिवीगाळ करून केली धक्काबुक्की

Ghugus city @news •घुग्घुस शहरातील नगरपरिषदेच्या रोजदारी कर्मचाऱ्यांला शिवीगाळ करून केली धक्काबुक्की

34

Ghugus city @news
•घुग्घुस शहरातील नगरपरिषदेच्या रोजदारी कर्मचाऱ्यांला शिवीगाळ करून केली धक्काबुक्की

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस:येथील नगरपरिषदमध्ये रोजनंदारीने काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांला शिवीगाळ केली,व धक्काबुकी करून सार्वजनिक शौचालया मधील नळाची तोडफोड केल्याची घटना दि.५ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. रोजनंदारीने काम करणाऱ्या कामगाराचे नावं संतोष भगत असे आहे.

घुग्घूस नगरपरिषद येथे रोजनंदारीने संतोष भगत हा काम करीत असून घटनेच्या दिवशी सायंकाळ ७ वाजता दरम्यान दीक्षित तलावाजवळीचा परिसरातील असलेल्या शौचालया जवळ कर्तव्य बजावत असताना विजय कवडू कामतवार हा इसम दारूच्या नशेत आला व कर्तव्यावर असलेल्या संतोष भगत या कामगाराला शिवीगाळ करून धक्काबुकी केली आणि सार्वजनिक शौचालया मधील नळाची तोडफोड केली.या घटनेची माहिती नगरपरिषद चे मुख्याधिकारी डॉ.जितेंद्र गादेवार यांना देण्यात आली असता घटनेच्या दिवशी रात्री पोलीस स्टेशन येथे दाखल झाले व दोषीवर योग्य ती फौंजदारी कार्यवाही व्हावी आणि यापुढे अशा प्रकारच्या अनुचित घटना घडू नये याकरिता सदर घटनेची तक्रार दिली असता पोलिसांनी विजय कवडू कामतवार या आरोपी विरुद्ध कलम 353,332,294,506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.