Home Breaking News Ballarpur city@news • चंद्रपुर-अंचलेश्वर गेट-बल्लारपुर बससेवा वेळेत सुरू करा विद्यार्थ्यांनी केली...

Ballarpur city@news • चंद्रपुर-अंचलेश्वर गेट-बल्लारपुर बससेवा वेळेत सुरू करा विद्यार्थ्यांनी केली आगारप्रमुखांना मागणी …….अन्यथा बस रोको आंदोलन करू- राजु झोडे

122

Ballarpur city@news

• चंद्रपुर-अंचलेश्वर गेट-बल्लारपुर बससेवा वेळेत सुरू करा विद्यार्थ्यांनी केली आगारप्रमुखांना मागणी
…….अन्यथा बस रोको आंदोलन करू- राजु झोडे

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

बल्लारपुर : शिक्षण घेण्यासाठी
चंद्रपूर शहरातून विद्यार्थी बल्लारपूरात व बल्लारपुरातील विद्यार्थी चंद्रपुरात रोज ये -जा करीत असतात मात्र सिटी बस वेळेवर येत नसल्याने त्यांची फारच गैरसोय होत आहे.त्यामुळे चंद्रपुर-अंचलेश्वर गेट-बल्लारपुर बससेवा सुरू करावी अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आज सोमवारी आगारप्रमुखांना एक लेखी निवेदन दिले .

चंद्रपूर व बल्लारपूर हे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाते.तर चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरातील व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो.परंतु चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट पासून बल्लारपुरात जाण्यासाठी सिटी बस उपलब्ध असली तरी बसची वेळ ठरवून नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना ये जा करण्यासाठी बसस्थानकावर सतत ताटकळत उभे राहावे लागत आहे.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, वेळ व पैसे वाया जात आहे.
हीच बाब लक्षात घेता आज उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आगरप्रमुखांशी चर्चा केली व बसेस नियमित सोडण्याची मागणी करण्यात आलीआहे.यावेळी श्याम झिलपे, दामोदर डेहने, पंचशील तामगाडगे, प्रदीप झामरे, जाकिर खान,व विद्यार्थी उपस्थित होते.