Home Breaking News Varora taluka@ news •महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ झोन पदाधिकारी जाहीर

Varora taluka@ news •महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ झोन पदाधिकारी जाहीर

531

Varora taluka@ news
•महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ झोन पदाधिकारी जाहीर

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

चंद्रपूर :- महावितरण विभागीय झोन अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर व वरोरा डिवीजन मध्ये रिक्त पदांवर कंत्राटी कामगार म्हणून तंत्रज्ञ व उपकेंद्र सहायक या पदावर कार्य करणारे तसेच रेगुलर. कर्मचाऱ्याच्या खाद्य ला खांद्या लावून काम करणारे बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगार यांची आज दिनांक ०९ आॅक्टोंबर ला भारतीय मजदूर संघ चंद्रपूर कार्यालयात बैठक पर पडली .

बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघचे जिल्हा अध्यक्ष हेमराज गेडे सह भारतीय मजदूर संघ चंद्रपूर चे अध्यक्ष प्रमोद येलचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर सर्कल तसेच डिवीजन चे पदाधिकारी यांची पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली . यामध्ये चंद्रपूर सर्कल अध्यक्ष अंकुश डोंगरवार , वरोरा डिवीजन उपाध्यक्ष जितेंद्र काळे , मिथुन गायकवाड (बल्लारशाह) , भारत वराटकर (चंद्रपूर )डिवीजन सचिव विकास डोंगरे (वरोरा) ,दिपक उमरगुंडावार (बल्लारशाह,) डिवीजन सहसचिव दिलीप भगत (वरोरा ), नितीन महाकुलकर (बल्लारशाह), चंद्रपूर सर्कल संघटक सचिव स्वप्निल तराळे सर्कल प्रसिद्ध प्रमुख सचिन पुसदेकर डिवीजन कार्यकारिणी सदस्य महादेव सिडाम (वरोरा ), रमाकांत उरकुडे (बल्लारशाह) व सर्व श्री सभासद गण वरोरा , बल्लारशाह, चंद्रपूर सर्कलचे सदस्य यांची निवळ करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित चंद्रपूर सर्कल अध्यक्ष यांनी संपूर्ण नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आले यावेळी महावितरण विभात बाह्य स्त्रोत यंत्रचालक व तंत्रज्ञ बरेच संख्येने उपस्थित होते.