Home Breaking News Bhadrawati taluka@news •बौद्ध लेणीस इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांची भेट •इतिहास विभागप्रमुख...

Bhadrawati taluka@news •बौद्ध लेणीस इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांची भेट •इतिहास विभागप्रमुख जयंत काकडे सर यांच्या मार्गदर्शनात 27 विद्यार्थ्याचा सहभाग

328

Bhadrawati taluka@news
•बौद्ध लेणीस इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांची भेट

•इतिहास विभागप्रमुख जयंत काकडे सर यांच्या मार्गदर्शनात 27 विद्यार्थ्याचा सहभाग

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र.भद्रावती

भद्रावती: स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच शहरातील विंजासन बुध्दलेणीस भेट दिली .सदर अभ्यास दौऱ्यात इतिहास विषयाचे २७ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. इतिहास विभागप्रमुख डॉ .जयवंत काकडे, मराठी विभागप्रमुख, डॉ. रमेश पारेलवार व इंग्रजी विभागातील प्रा. अमीत बांबोडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी टेकडी परीसराचे निरिक्षण व अध्ययन केले. या भेटीनंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ काकडे यांनी सांगितले की,” प्राचीन भारताच्या इतिहासाचे साधन म्हणून भौतिक साधनांना अत्यंत महत्त्व आहे. त्या साधनांची उपलब्धता भद्रावती व भद्रावती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना इतिहासाचे लेखन व इतिहास समजण्यासाठी म्हणून भद्रावती लगतच्या विजासन येथील बौद्ध लेणीला क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. विजासन येथील बौद्ध लेणी ही विदर्भातील लेण्यांमध्ये आकाराने सर्वात मोठी लेणी आहे असे सांगितले.