Home Breaking News Thane dist@ news • एस.एम.जी.विद्यामंदिर, विद्यार्थ्यांनी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईच्या आयोजित...

Thane dist@ news • एस.एम.जी.विद्यामंदिर, विद्यार्थ्यांनी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईच्या आयोजित श्री गणेशोत्सव राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी मारली!

371

Thane dist@ news
• एस.एम.जी.विद्यामंदिर, विद्यार्थ्यांनी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईच्या आयोजित श्री गणेशोत्सव राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी मारली!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

ठाणे:ओम साई शिक्षण संस्था संचालित एस.एम.जी.विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दातिवली दिवा पूर्व शाळेतील मराठी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित श्री गणेशोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय चित्रकला रंगभरण स्पर्धेत यश संपादन केले आहे.

या स्पर्धत गट क्रमांक पाच मधून साहित्य निलेश बोबले (इयत्ता दहावी )याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तर स्वप्ना संदिप घबाडे( इयत्ता दहावी) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे या शिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकात( इयत्ता दहावीचा) चिराग सुनील साईल निकीता श्रीकांत पाटील व ओमकार मनोहर खंडागळे (इयत्ता नववी) या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यासर्व विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे सचिव स्वप्निल गायकर मुख्याध्यापिका सानिका सरपोळे वशिक्षकवृंदानी केले आहे.