Home Breaking News Chandrapur dist@ news • भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकुर यांच्या राजीनाम्यानंतर मनसे...

Chandrapur dist@ news • भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकुर यांच्या राजीनाम्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

130

Chandrapur dist@ news
• भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकुर यांच्या राजीनाम्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:मागील वर्षी पक्ष प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आल्यानंतर चंद्रपुरात नेतृत्वात बदल करण्यात आले होते .यात प्रामुख्याने युवांना नेतृत्व देण्यात आले होते. त्यानंतर महिला सेनेच्या शहर अध्यक्षपद प्रतिमा ठाकुर यांच्याकडे देवून जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली,परंतु दोन्ही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे दुसरे पदाधिकाऱ्यांनी कधीही महिला जिल्हाध्यक्षांना मान दिला नाही,कधीही त्यांचे सोबत जिल्हा दौरा केला नाही.

यातच या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी काम करणारे वाहतूकचे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप केले,परंतु सत्यता ही आहे की जिल्ह्यात यांच्या नेतृत्वात चार ते पांच विंगचे जिल्हाध्यक्ष पद भेटून ही एकटेच आहे,कोणतीही बांधणी नाही,ना कोणताही कार्यकर्ता यांच्या मागे,तरीही ह्यांना फक्त वाहतूक जिल्हाध्यक्षच दिसत होते .

काम करणाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे काम सध्या दोघांकडून सुरू आहे,म्हणून मागच्या आठवड्यात मुंबई येथे बाळा साहेब भवनला शिवसेनेचे नेत्या नीलम ताई गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर आज महिला सेना तसेच वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्यानंतर पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्धार केला,व शिवसैनिक बनून काम करण्याचा संकल्प केला आहे.