Home Breaking News सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप नवोदितांसाठी प्रेरणादायी -शारदा मेश्राम

सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप नवोदितांसाठी प्रेरणादायी -शारदा मेश्राम

183

सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप नवोदितांसाठी प्रेरणादायी -शारदा मेश्राम

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

निव्वळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सहज सुचलंचे नांव मोठ्या आदराने घेतल्या जाते.या गृपवर लेखिका , समाजसेविका, कवयित्री,महिला अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश असून नवोदितांना हा गृप सदैव प्रेरणादायी ठरला आहे असे मत शारदा मेश्राम यांनी आज गुरुवारी नागपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक ,जेष्ठ समाजसेविका तथा या गृपच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता साहित्यिक पुरस्कार प्राप्त मेघा धोटे यांचे या गृपसाठी मोलाचे योगदान ठरले असल्याचे शारदा मेश्राम या वेळी बोलताना म्हणाल्या. किरण साळवी,विजया तत्वादी, श्रुति उरणकर,स्मिता बांडगे,रजनी रणदिवे, वर्षा कोंगरे, मेघा मिलमिले, वर्षा आत्राम ,चैताली आत्राम, किर्ती पांडे, मुग्धा खांडे ,मंगल मिसाळ मनिषा बि-हाडे,यांचेही योगदान तेव्हढेच या गृपसाठी मोलाचे ठरले आहे.