◻️🏵️◻️नवरात्री◻️🏵️◻️
🏵️◻️सौ.वंदना अजय आगलावे
वरोरा सहज सुचलं सदस्य
नव दिवसाचा उत्सव
असे नवरात्री सणाचा
उधाण येई आनंदाला
भाव विभोर होई बाला
घरोघरी घट पूजन
करिती मनोभवे सर्व
अखंड ज्योत तेव्विण्याचा
संकल्प मनी दीप पुजनाचा
दीपपूजन करी अंधकार दुर
सगळीकडे तेजोमय प्रकाश
भगिनींचे व्रत वैकल्ये उपवास
रक्षिन्या घाली साकड अंबेस
नवदिवसाचे नव अवतार
देवी घेई या धरणीवर
सृष्टीचे पालन करण्यास
तत्पर माझी अंबा खास
नव रंगी वस्त्र लेवूनी
नव दिवस मिरवी आई
नव रंगाची नव नवलाई
परिधनाची सर्वा घाई
काम, क्रोध,मत्सर,द्वेष
नसे कुठे याचा लवलेश
आनंदी आनंद चहूकडे
अंगणी सुबक रांगोळी सडे
