Home Breaking News Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी गटप्रवर्तक व आशा वर्कर्स उतरले...

Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी गटप्रवर्तक व आशा वर्कर्स उतरले रस्त्यावर ! •चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले निषेध आंदोलन !

99

Chandrapur dist@ news
• रास्त मागण्यांसाठी गटप्रवर्तक व आशा वर्कर्स उतरले रस्त्यावर !
•चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले निषेध आंदोलन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:विविध रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों गटप्रवर्तक व आशा वर्कर्स आज बुधवारला दुपारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर झालेल्या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याचे दिसून आले.राष्ट्रीय आरोग्य अभियानात चार हजार गट प्रवर्तक व सत्तर हजार आशा वर्कर्स गेल्या १८वर्षां पासून कार्यरत असून त्यांच्या शासन दरबारी ब-याच मागण्या प्रलंबित आहेत.गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा , त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, सामाजिक सुरक्षा लागु करावी , किमान वेतन लागू करावे आदिं विविध मागण्यांसाठी आयटकने आज पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान बुधवारी झालेल्या निषेध आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेंकडों आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्याचे दिसून आले.उपरोक्त संप यशस्वी करण्याचे आवाहन आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे यांनी या पूर्वीच केले होते. आज झालेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.