Home Breaking News Chandrapur dist@ news • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा उपअभियंता विनोद कुमार भोयर...

Chandrapur dist@ news • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा उपअभियंता विनोद कुमार भोयर गडचिरोली एसीबीच्या जाळ्यात!

45

Chandrapur dist@ news
• महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा उपअभियंता विनोद कुमार भोयर गडचिरोली एसीबीच्या जाळ्यात!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:मोदुमोडगु येथील एका ग्राहकाला घरगुती मिटर फाॅल्टी असून आपणांस यासाठी बराच दंड भरावा लागेल असे कारण सांगून त्यांचे कडून तब्बल वीस हजारांची लाच घेणारा आल्लापल्ली येथील एक उपअभियंता काल गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक खात्याचा जाळ्यात अडकला.

या उपअभियंताचे नांव विनोद कुमार भोयर असे असून सदरहु उपअभियंताने उपरोक्त कामासाठी तब्बल ४०हजार रुपयांची लाच मागितली होती.नंतर वीस हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा सौदा पक्का झाला .पहिल्याच हप्त्यात तो एसीबीच्या गळाला लागला! ही धडक कारवाई गडचिरोलीच्या एसीबी पथकाने यशस्वीपणे केली.या बाबतीत अहेरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरहु उपअभियंता आलापल्ली येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात उपअभियंता म्हणून कार्यरत होता.