Chandrapur city@ news
• अ. भा. ग्राहक मंच शाखा नेरीच्या अध्यक्षपदी रामचंद्र कामडी यांची निवड
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चिमूर : तालुक्यातील नेरी येथे अखिल भारतीय ग्राहक मंचची नुकतीच एक सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अधिवक्ता नागदेवते होते .तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून चिमूर तालुका ग्राहक मंचचे अध्यक्ष राम चिचपाले उपस्थित होते. आयोजित सभेत शाखा नेरीची नव्याने कार्यकारिणी घोषीत करण्यात आली . दरम्यान अखिल भारतीय ग्राहक मंच शाखा नेरीच्या अध्यक्षपदी रामचंद्र ताराचंद कामडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या शिवाय मधुकर सोनुने यांची उपाध्यक्षपदी तर भास्कर अंडरस्कर यांची सचिवपदी निवड करण्यात आली असून काहींची सदस्य म्हणून सर्वानुमते या सभेत निवड करण्यात आली.
