Home Breaking News Chandrapur dist@ news • मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी :सतिश बिडकर यांचे गडचांदूर...

Chandrapur dist@ news • मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी :सतिश बिडकर यांचे गडचांदूर नगर परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन!

40

Chandrapur dist@ news
• मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी :सतिश बिडकर यांचे गडचांदूर नगर परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचांदूर:शहरातील मोकाट कुत्र्यांचा नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी प्रहार जिल्हाध्यक्ष सतिश बिडकर यांनी स्थानिक नगरपरिषद कार्यालयात मुलाला सोबत घेऊन ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून शहरात भटक्या कुत्र्यांनी व डुकरांनी उच्छाद मांडलेला असून डुकरांच्या उच्छादाने एका वर्षापूर्वी कर्ताधरत्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सर्वश्रूतच आहे.आताच काही दिवसांपूर्वी डुकरांमुळे एका व्यक्तीच्या वाहनाला अपघात घडला आहे. तर दुसरीकडे शहरातील कित्येक नागरिकांना मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिक जनतेंनी व समाजसेवकांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकरिता तोंडी सुचना व लेखी निवेदने दिली. परंतु स्थानिक नगर परिषद प्रशासनाने या कडे लक्ष पुरविले नाही.दरम्यान प्रहार जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्याच मुलाला घराच्या अंगणात खेळताना दोन कुत्र्यांनी चावा घेतला. अनेक वेळा स्वतः सतीश बिडकर यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना लेखी निवेदने दिली. पण नगर परिषदेने त्या निवेदनाची दखल घेतली नाही . त्यांनी आपल्या मुलाला घेवून नुकतेच नगरपरिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारले आहे.