Home Breaking News Chandrapur dist@ news • ट्राॅंसफार्मर ना दुरुस्तीमुळे गुडगांव – वडेगांवचा पाणी पुरवठा...

Chandrapur dist@ news • ट्राॅंसफार्मर ना दुरुस्तीमुळे गुडगांव – वडेगांवचा पाणी पुरवठा पूर्णता ठप्प •ट्राॅंसफार्मर नविन बसवा- सुधीर मुडेवार यांची मागणी !

53

Chandrapur dist@ news
• ट्राॅंसफार्मर ना दुरुस्तीमुळे गुडगांव – वडेगांवचा पाणी पुरवठा पूर्णता ठप्प
•ट्राॅंसफार्मर नविन बसवा- सुधीर मुडेवार यांची मागणी !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सह संपादक

भद्रावती:तालुक्यातील गुडगांव – वडेगांव येथील ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी जवळील विद्युत ट्राॅंसफार्मर जळाल्याने दोन्ही गावांचा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडलेला असून विहिरीजवळील ट्राॅंसफार्मर नवीन बसविण्यात यावे अशी मागणी एका लेखी निवेदनातून चंदनखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांनी केली आहे .दरम्यान त्यांनी या मागणीचे एक निवेदन महावितरण कंपनीच्या अभियंताला सादर केले आहे.

गुडगांव- वडेगांव या गावात गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत गावातील प्रत्येक घरांना नियमित पाणीपुरवठा केल्या जात होता. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून येथील ट्राॅंसफार्मर जळाल्याने संपूर्ण गावातील पाणीपुरवठा ठप्प पडलेला आहे .त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दहादिशा फिरावे लागत आहे.

।गावातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांनी ट्राॅंसफार्मर नवीन बसविण्याकरिता लेखी व तोंडी सूचना संबंधित विभागास केल्या आहेत .मात्र याकडे महावितरण कंपनीने पूर्णता दुर्लक्ष केल्याचे दिसून येते . ट्राॅंन्सफार्मर तातडीने बसविण्यात आले नाही तर जन आंदोलन करण्याचा इशारा सुधीर मुडेवार यांनी दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार, वंदना दातारकर, उपसरपंच जयदीप खोब्रागडे, शैलेश चौधरी, यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.