Home Breaking News Chandrapur city@ news • अमली पदार्थांची वाहतुक करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी...

Chandrapur city@ news • अमली पदार्थांची वाहतुक करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी केले गजाआड !

246

Chandrapur city@ news
• अमली पदार्थांची वाहतुक करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी केले गजाआड !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर :- अमली पदार्थांची वाहतुक करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.दरम्यान त्यांचे कडून
19,80,000 चे M. D. (मॅफेड्रान) पॉवडर, अंमली पदार्थासह 28.02,700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत दि. 30/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय येथे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता पडोली चौक येथे येणार आहे. सदरची माहिती वरीष्ठांना देवुन पोलीस स्टेशन पडोली हद्दीत थांबुन असताना एक चार चाकी वाहन ज्याचा क्रमांक एमएच-34- बीआर-5951 ही नागपुर कडुन चंद्रपूरच्या दिशेने येतांना दिसली. सदर चारचाकी वाहनास थांबवुन झडती घेतली असता, ड्रायव्हरचे सिटचे बाजुला बसलेला इसम नामे शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस यांचे हातातील थैलीमध्ये पांढन्या मुरकट रंगाचे पॉवडर M. D. (मॅफेड्रान) वजन 198 ग्राम किंमत 19,80,000/- रू तसेच त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार किंमत अंदाजे 500/- रु मिळुन आले.

सदरहु कारवाई दरम्यान दोन्ही आरोपी नामे शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर, साहील ईजराइल शेख वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांचे कडून 198 ग्राम एमडी पॉवडर किंमत 19,80,000/- , दोन नग विव्हो कंपनीची मोबाईल किंमत 20,000/- रु, एक बलेनो कार एमएच-34- डीआर 5951 किंमत 8,00,000/- रू, आरोपीचे अंग झडतीत नगदी 2200/- रू, एक लोखंडी तलवार किंमत 500/- रू असा एकूण 28,02,700/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही आरोपींनी अटक करून पो .स्टे .पडोली अप क. 319/2023 कलम 8 (क). 21 (क) गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 सकलम 4. 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि नागेश चतरकर हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंगे तसेच पो. स्टे .सायबरचे छगन जांभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली आहे.