Home Breaking News Chandrapur city@ news • राजू आत्राम यांचे चंद्रपूरात बेमुदत आमरण उपोषण सुरू!...

Chandrapur city@ news • राजू आत्राम यांचे चंद्रपूरात बेमुदत आमरण उपोषण सुरू! • उपोषणाचा आजचा दुसरा दिवस

181

Chandrapur city@ news
• राजू आत्राम यांचे चंद्रपूरात बेमुदत आमरण उपोषण सुरू!
• उपोषणाचा आजचा दुसरा दिवस!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

माजरी: येथील शिवाजी नगर गट क्रमांक २०मध्ये मागिल तीन पिढ्यांपासून आदिवासी जमातीचे लोक वास्तव्य करीत आहेत.दरम्यान नागलोन खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारकरणात व होणा-या ब्लाॅस्टींगमुळे येथील आदिवासी लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एव्हढेच नाही तर घरांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.सोबतच प्राणहानी व वित्तहानी झालेली आहे.प्रदुषणामुळे अनेक लोक आजारग्रस्त झाले आहे.या बाबतीत शासनस्तरावर व प्रशासनाकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या पण याची मुळीच दखल घेतली नाही.गावक-यांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी काल सोमवार पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मीच्या माध्यमातून राजू तातोबा आत्राम यांनी आपले बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.