Home Breaking News Chandrapur dist@ news • पंधराव्या दिवशीही चंद्रपूरात आशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत धरणे...

Chandrapur dist@ news • पंधराव्या दिवशीही चंद्रपूरात आशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ! •शासनाने अद्याप घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल • मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करु -शासनाला आयटकचा इशारा!

326

Chandrapur dist@ news
• पंधराव्या दिवशीही चंद्रपूरात आशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच !
•शासनाने अद्याप घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल • मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करु -शासनाला आयटकचा इशारा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:महाराष्ट्र राज्य आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटकच्या वतीने गेल्या 18 ऑक्टोंबर पासून चंद्रपूरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा १५वा दिवस आहे.परंतु अद्याप शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही.गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी द्या,वार्षिक वेतन वाढ देण्यात यावी ,अनुभव बोनस द्यावा या शिवाय आशा वर्करला किमान वेतन,दिवाळी भाऊबीज आणि ऑनलाईन कामाची सक्ती करु नये आदिं प्रमुख मागण्यांसाठी आयटकच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आज जोरदार नारेबाजी करीत सरकारवर आपला रोष व्यक्त केला आहे.दरम्यान चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे .यापूर्वी देखील मोर्चा काढून मागण्या मंजूर कराव्या याकरिता निवेदन देण्यात आले होते .परंतु शासनाने याकडे अद्याप लक्ष पुरविले नाही.

महाराष्ट्र आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समितीने गेल्या 18 ऑक्टोंबर पासून आपल्या रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. चंद्रपूरात सुरु असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व कॉ .विनोद झोडगे कॉ.रवींद्र उमाटे कॉ .प्रकाश रेड्डी कॉ.सविता गठलेवार ,अर्चना गेडाम,कल्पना मिलमीले परवीन शेख,वैशाली जूपाक्का,उषा उराडे ,शीतल मुळे हे करीत आहेत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसें दिवस त्यांच्यावर कामाचा दबाव अधिक वाढविण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती आहे.अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात त्यांना प्रपंच चालविणे कठीण होवून बसले आहे.

जो पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या आंदोलनातून माघार घ्यायची नाही असा संकल्प निकीता निर,शालू लांडे,कोकिळा गरुडे,पोर्णिमा किर्तीवार,सुषमा येनगंटीवार ,प्रेमिला बावणे, आशा चलाख ,सविता गटलेवार , प्रिया भसारकर,पौर्णिमा जुनघरे,लता उराडे,सखू खोके ,नेहा जगताप, वैशाली रामटेके,मेघा हजारे,पुजा मोहूर्ले, प्राजक्ता गेडाम,फरजाना शेख, वंदना निरंजने यांच्यासह अनेकांनी केला आहे.