Home Breaking News Chandrapur dist@ news • राजू आत्राम यांचे चंद्रपूरात बेमुदत आमरण उपोषण सुरू!...

Chandrapur dist@ news • राजू आत्राम यांचे चंद्रपूरात बेमुदत आमरण उपोषण सुरू! उपोषणाचा आजचा तिसरा दिवस!

199

Chandrapur dist@ news
• राजू आत्राम यांचे चंद्रपूरात बेमुदत आमरण उपोषण सुरू! उपोषणाचा आजचा तिसरा दिवस!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:माजरी येथील शिवाजी नगर गट क्रमांक २०मध्ये मागिल तीन पिढ्यांपासून आदिवासी जमातीचे लोक वास्तव्य करीत आहेत.दरम्यान नागलोन खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारकरणात व होणा-या ब्लाॅस्टींगमुळे येथील आदिवासी लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एव्हढेच नाही तर घरांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.सोबतच प्राणहानी व वित्तहानी झालेली आहे.प्रदुषणामुळे अनेक लोक आजारग्रस्त झाले आहे.या बाबतीत शासनस्तरावर व प्रशासनाकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या पण याची मुळीच दखल घेतली नाही.गावक-यांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी गेल्या सोमवार पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मीच्या माध्यमातून राजू तातोबा आत्राम यांनी आपले बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन उभारु असा इशारा भीम आर्मीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र रायपुरे यांनी आज प्रशासनाला दिला आहे.आत्राम यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.दरम्यान या उपोषणाला गणेश पेंदोर, रामचंद्र खंडाळकर,मिरा पेंदोर, गजानन मेश्राम, प्रेमिला जुमनाके,जिजा जुमनाके , लीलाबाई मेश्राम, सुवर्णा कोवे ,शितल उईके,कैशल्यादेवी केवर, ग्यानदेवी केवर आदिंनी पाठिंबा दिला आहे.