Home Breaking News Ballarpur city @news • बल्लारपुर मटण मार्केट दुरुस्ती करण्याची मागणी

Ballarpur city @news • बल्लारपुर मटण मार्केट दुरुस्ती करण्याची मागणी

533

Ballarpur city @news
• बल्लारपुर मटण मार्केट दुरुस्ती करण्याची मागणी

✍️पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपूर :- शहरातील मटण मार्केट समस्याचे घर बनले आहे. येथील मटण मार्केट मध्ये नाली ची व्यवस्था नसल्याने विक्रेताना नाहक सहन करावे लागत आहे. मटण विक्रेत्यांना बकरी बांधण्याकरिता शेड आहे पण तिथे लावले टिन खराब झाले आहे. त्यामुळे तिथे बकरी ठेवण्यास अडचण होत आहे. तिथे नाली नसल्यामुळे पूर्ण घान जमा होत आहे तसेच दुर्गंधी पसरत आहे.
या विषयी येथील मटण मार्केट विक्रेत्यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन दिले. या वेळी विनोद माकोडे, प्रफुल कटारे, विशाल तुमाने, पवन तूमाने, विकास दुर्गे सह आदी मटण विक्रेते उपस्थित होते.