Home Breaking News Akola city @ news • शास्त्रीनगरच्या हनुमान मंदिर प्रांगणात कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन...

Akola city @ news • शास्त्रीनगरच्या हनुमान मंदिर प्रांगणात कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन ; अनेकांची उपस्थिती

159

Akola city @ news
• शास्त्रीनगरच्या हनुमान मंदिर प्रांगणात कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन ; अनेकांची उपस्थिती

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

अकोला -प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नामवंत अकोला सहज सुचलं “महिलांच्या हक्काचे “व्यासपीठच्या मुख्य संयोजिका तदवतचं विदर्भातील सुपरिचित जेष्ठ साहित्यिक तथा सामाजिक महिला कार्यकर्त्या प्रांजल रायपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शनिवारला शास्त्रीनगरात रात्री कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आयोजित कार्यक्रमाला या वार्डातील पुरुष महिला व बच्चेकंपनी मोठ्या संख्येंने उपस्थित होती.या कोजागिरीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काही स्पर्धा घेण्यात आल्या,विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रसंगी पुरस्कार देण्यात आले .

तन्मय खरोटे यांनी महिलांच्या एकत्रीकरणासाठी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून
स्थानिक हनुमान देवस्थानच्या प्रांगणात सदरहु कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या वेळी बच्चेकंपनी साठी आर .जे. श्रीने यांनी एक मिनिट स्पर्धा आयोजित केली होती.सोबतच महिलांसाठी काही मनोरंजनाचे खास कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
शेवटी अल्पोहारासोबतच उपस्थितीतांनी कोजागिरीतील
दूधाचा आस्वाद घेतला . या वेळी काही मान्यवरांना या प्रसंगी आकर्षक भेट वस्तू वितरीत करण्यात आल्या. एकंदरीत हा कार्यक्रम उपस्थित मंडळींच्या सदैव स्मरणात राहावा असाच थाटात पार पडला.

‌‌