Home Breaking News ◻️🏵️◻️प्रवास अज्ञानाकडून विज्ञानाकडे ! ◽🌺◽कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं काव्यकुंज...

◻️🏵️◻️प्रवास अज्ञानाकडून विज्ञानाकडे ! ◽🌺◽कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ठाणे◽🌺

68

◻️🏵️◻️प्रवास अज्ञानाकडून विज्ञानाकडे !

◽🌺◽कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ठाणे◽🌺◽

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

तिमिरातून तेजाकडे
जाण्याचा मार्ग शिक्षण
दाखवला साऊज्योतिने
त्यामुळेच झाले रक्षण //१//

प्रवास अज्ञानाकडून
विज्ञानाकडे करण्या
हवी साथ शिक्षणाची
अंधश्रद्धेवर‌ घाव‌ घालण्या //२//

विज्ञानाची धरता कास
अज्ञानाचा होईल नाश
स्री पुरुष समानतेने
होईल वाईटाचा सर्वनाश//३//

अज्ञानाचा नाश केला
ज्ञानेश्वरांनी, आंबेडकरांनी
समाजाला केले जागृत
प्रवचन व लेखणीनी //४//

विज्ञानाकडे करता प्रवास
होऊ लागली प्रगती
अज्ञानामुळे घडत होती
समाजाची अधोगती //५//

जेव्हा झाला सुरू प्रवास
अज्ञानाकडून विज्ञानाकडे
चंद्रयान तीन‌ पोहचले
पहा थेट चंद्राकडे//६//

विज्ञान आहे दुधारी तलवार
कोण कसा करेल वापर
यावर आहे अवलंबून
मानवाचा जीवन स्तर//७//