Bhadravti taluka @news
• भद्रावतीला येत्या 7 तारखेला कॅन्सर निदान व गुप्तरोग शिबिराचे आयोजन !
• नामवंत डॉ.मंडळींची राहणार उपस्थिती
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर: जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रावतीत येत्या 7 तारखेला टाटा ट्रस्ट कॅन्सर हाॅस्पिटल चंद्रपूर, ग्रामीण रुग्णालय भद्रावती,व व्हर्च्युअस मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती यांच्या संयुक्तीक विद्यमाने महिलांचे स्तन,मुख आणि शरीरांच्या इत्तर भागातील तपासणी,महिलांची गुप्तरोग तपासणी,लघवी ठिकाणचे आजार ,पांढरे पाणी, ओटीपोटीचे दुखणे, पुरुषांच्या सर्व प्रकारची कॅन्सर तपासणी तदवतचं यावर उपस्थित नामवंत डॉक्टर मंडळीचे मार्गदर्शन होणार आहे.या शिबिराला प्रामुख्याने टाटा ट्रस्टचे टीम लिडर डॉ.आशिष ,डि.एस.आर.सी. चंद्रपूरच्या डॉ.राखी देशमुख, ग्रामीण रुग्णालयात भद्रावतीचे शितल भडके, व्हर्च्युअस मल्टीपर्पज सोसायटीच्या भद्रावती कु.किरण विजय साळवी उपस्थित राहणार आहेत.या शिवाय सदरहु शिबिराला डॉ.आशिष बारब्दे ,सुरज सांळूके , डॉ.ट्विंकल धेंगले,काजल विश्वास, वैष्णवी सहारे उपस्थित राहणार असल्याचे किरण साळवी यांनी सांगितले.
सदरहु शिबिर भद्रावती येथील बॅंक ऑफ इंडिया (जुणी) पहिला माळा, झिंगुजी महाराज मठाजवळ मेन रोड (भद्रावती)या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. जनतेंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन किरण साळवी यांनी केले आहे.
