Home Breaking News Bhadrawati taluka@news • भद्रावतीत “तुमचा स्व शोधा” या विषयावर दोन दिवसीय...

Bhadrawati taluka@news • भद्रावतीत “तुमचा स्व शोधा” या विषयावर दोन दिवसीय युवा कार्यशाळा संपन्न … •आव्हाने,स्पष्टता आणी विकास या साठी युवकांनी पुढाकार घ्यावा.- धम्मचारी अमलदर्शी

124

Bhadrawati taluka@news

• भद्रावतीत “तुमचा स्व शोधा” या विषयावर दोन दिवसीय युवा कार्यशाळा संपन्न …

•आव्हाने,स्पष्टता आणी विकास या साठी युवकांनी पुढाकार घ्यावा.- धम्मचारी अमलदर्शी

✍️ मनोज मोडक
तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती- आपण आपला “स्व’ शोधल्याशिवाय आपले जीवन शोधू शकत नाही.” कारण “स्व” प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक यशासाठी जबाबदार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात,आजचा युवक भरकललेला आहे म्हणून जीवन स्पष्ट आणि सशक्त बनवण्यासाठी व युवा जागरूकता निर्माण व्हावी या करिता त्रिरत्न बौद्ध महासंघ भद्रावती च्या वतीने डाॅ.आंबेडकर स्मारक शाळा,भद्रावती येथे 18 ते 40 वयोगटातील युवकांकरिता “स्वतःचा शोध घ्या” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आदरणीय धम्मचारी अनोमशुर,एम.ए.मानसशास्त्र, नागपूर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली.
कु.प्राजक्ता मोडक यांनी धम्मचारी अनोमशुर यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यशाळेत भद्रावतीतील युवक व युवतींनी सहभाग नोंदवला असून ही कार्यशाळा युवकांसाठी प्रेरणादायक असल्याचे मत युवकांनी व्यक्त करीत आयोजकाचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी धम्मचारी अमलदर्शी , धम्म मित्र मिलिंद वाघमारे,अमिर शहा यांच्या सह त्रिरत्न बौद्ध महासंघ शाखा भद्रावती तील सर्व धम्म मित्र यांनी सहकार्य केले.