Home Breaking News Bhadrawati taluka@news • डॉ.मेघनाथ साहा यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी: डॉ.संजय ढोबळे...

Bhadrawati taluka@news • डॉ.मेघनाथ साहा यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी: डॉ.संजय ढोबळे शास्त्रज्ञ • शास्त्रज्ञ प्रा.डॉ संजय ढोबळे यांच्या हस्ते डॉ.मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य पुस्तकाचे प्रकाशन

77

Bhadrawati taluka@news

• डॉ.मेघनाथ साहा यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी:
डॉ.संजय ढोबळे शास्त्रज्ञ

• शास्त्रज्ञ प्रा.डॉ संजय ढोबळे यांच्या हस्ते डॉ.मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य पुस्तकाचे प्रकाशन

✍️मनोज मोडक ता. प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती -विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेवराव हटवार लिखित “डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य ” या पुस्तकाचे प्रकाशन सेवादल महिला महाविद्यालय येथे करण्यातआले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष , पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्‌घाटन डॉ. प्रा. संजय ढोबळे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलतांना डॉ. ढोबळे म्हणाले की,
” समाजभूषण खगोलशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले”.
त्यावेळ प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ. विजयाताई मारोतकर कवियत्री व लेखिका ,मा. नितीन कुंभलकर सामाजिक कार्यकर्ते, मा. शेखर गुल्हाने सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी , विशेष अतिथी म्हणून रघुनाथ शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, प्रा. डॉ. नामदेवराव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ, अँड. प्रा. रमेश पिसे , कृष्णाजी बेले, जानकीताई सेलूकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

त्यावेळी प्रा. डॉ. नामदेवराव हटवार यांनी डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती आणि कार्य या पुस्तका बद्दल थोडक्यात परिचय करून दिला. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुरेश वंजारी अध्यक्ष नागपूर शहर ,प्रास्ताविक प्रा. प्रेमानंद हटवार तर आभार प्रदर्शन संजय सोनटक्के सचिव यांनी केले.

कार्यक्रमाला उपस्थित धनराज तळवेकर, राजेंद्र डकरे, शंकर ढबाले, रमेश उमाटे, ज्ञानेश्वर रायमल, मिराताई मदनकर, वंदना वनकर , शुभांगी घाटोळे, मायाताई वाघमारे , अनिल घुसे, पुरषोत्तम कामडी , सुभाष कळंबे , प्रशांत मदनकर, माणिकराव सालनकर, विलास काळे, केशवराव शेन्डे, दिपक खोडे , डॉ. विलास तळवेकर , आनंद नासरे, राम कावडकर, राजूभाऊ तळवेकर, कमलाकर राजूरकर , संजय भलमे आणि इतर तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.