Home Breaking News Chandrapur city@ news • आज चंद्रपूरात होतेय चटणी भाकर आंदोलन!

Chandrapur city@ news • आज चंद्रपूरात होतेय चटणी भाकर आंदोलन!

141

Chandrapur city@ news
• आज चंद्रपूरात होतेय चटणी भाकर आंदोलन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर: ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी बेमुदत आंदोलनात उतरले असून या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या प्रलंबित व रास्त मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे.

कालपासून त्यांनी काळी दिवाळी साजरी करण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.शासनाने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविन्द्र उमाटे यांनी आज संध्याकाळी आंदोलन स्थळावरुन एका भेटी दरम्यान सांगितले कि शासनाने या मागण्या जलद गतीने न सोडविल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन करु !