Chimur taluka@ news
• धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची तत्काळ अमलबजावणी करा: धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..
✍️ शार्दूल पचारे
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, चिमूर
चिमूर:शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाची मुद्दत संपल्यामुळे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अमलबजावणी करण्याकरीता धनगर समाज चिमूरच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्वात आहे. डोंगरद्र्यात राहणारे. भटकंती करून उपजीविका भागवनारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहे. कित्येक पिढ्या मागसले पणाची झळ सोसत आहेत. भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला एस टी प्रवरगात स्थान दिले आहे. मात्र गेल्या 70 वर्षात सर्वच सरकारांनी आरक्षण अमलबजावणी पासून फारकत घेतली आहे.. या अनुषंगाने राज्यभर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.
आरक्षण देण्यासंदर्भात सरकार तर्फ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 दिवसाची वेळ मागून घेतली होती ते 50 दिवस संपले असून सुधा आहे. तरीसुद्धा धनगर समाज आरक्षण देण्यासंदर्भात सरकार दरबारी साधं पांनही हल्ल नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आपण धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न तत्काळ निकालात काढावा अनयथा धनगर समाजाच्या संविधनिक मार्गाने चालणाऱ्या तीव्र आंदोनाला समोर जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी डॉ महेश खानेकर. गणेश भरके. विनोद खवसे. प्रशांत चिडे. हिमांशू झालवडे. यशवंत कोरडे. अक्षय खवसे. आशितोष भुते. निखिल कांडस्कर. प्रफुल तुरारे. आयुष तूरारे. ऋषी बारचंने व अन्य धनगर बांधव उपस्थित होते


