Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे अवैध वेंडरवर कारवाई

Ballarpur city@ news • बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे अवैध वेंडरवर कारवाई

143

Ballarpur city@ news
• बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे अवैध वेंडरवर कारवाई

बल्लारपूर :- स्थानिय रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रवाशांसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू विकण्याची व्यवस्था ११ स्टॉलच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने केली आहे व त्यावर देखरेख येथील रेल्वे प्रशासनाची असते. परंतु, त्यांची नजर चुकवून रेल्वेस्थानकावर फलाटावर घुसून अवैध वेंडर खाण्याच्या वस्तू व अनधिकृत साहित्य विकत असतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा वेंडरवर नागपूर रेल्वेचे विभागीय वाणिज्य प्रबंधक हुसेन यांनी आपल्या चमूसह येऊन कारवाई केली. पाणी बॉटल व इतर वस्तू जप्त केल्या.

बल्लारपूर स्थानकावर अनेक दिवसांपासून खानपानाच्या वस्तू विकणाऱ्या स्टॉलवर अवैध वेंडर आहे तर रेल्वेच्या नियमानुसार वस्तू न विकता आय.आर.सी.टी.सी. स्टॉलचालक नियमाचे उल्लंघन करतात. याची तक्रार रेल्वेच्या वरिष्ठांना मिळताच त्यांनी आपल्या चमूसह रेल्वे गाडीने न येता कारने बल्लारशाह रेल्वेस्थानकावर येऊन फलाट क्रमांक १ व ४ आणि ५ वर अनधिकृत साहित्य विकणाऱ्यांचे साहित्य जप्त केले.