Chandrapur dist@news
• एकच मिशन समायोजन!
•कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी उतरले गेल्या 30 दिवसांपासून रस्त्यावर !
• शासन घेत नाही त्यांच्या आंदोलनाची दखल: रविंद्र उमाठेंच्या नेतृत्वात करतात ” ते ” चंद्रपूरात आंदोलन!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपुर: गेल्या 30 दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे .परंतु या आंदोलनाकडे राज्य शासनाने अद्याप लक्ष पुरविले नाही.त्यामुळे आंदोलनकर्त्यांत शासना विरुध्द नाराजीचा सुर उमटल्याचे दिसून येते.दरम्यान याच आंदोलनकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तरी देखील शासन जागे झाले नाही.
त्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या सोडव्याव्यात अशी मागणी आता सर्व स्तरावरून होवू लागली आहे.जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सुरू असलेले आंदोलन मागे घ्यायचे नाही असा संकल्प या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे मुख्य समन्वयक काॅम्रेड रविन्द्र उमाठे, डॉ.शिल दुधे, डॉ .अक्षय बुर्लावार, डॉ.तिरथ उराडे,डॉ.तुषार अगडे, डॉ.विनोद फूलझेले, काॅम्रेड प्रकाश रेड्डी, अधिवक्ता राम इंगळे, वनिता मेश्राम, आराधना झा, ललिता मुत्यलवार,जया मैंदळकर, शालिनी दुर्गे, रजनी धापटे, वैभव आत्राम, ज्योति आसुटकर,प्रकाश मामिडवार,सुरज डूकरे, डॉ.पुजा महेशकर, मर्सिस्टेला गजर , शिल्पा वाढई, डॉ.नितिन गायकवाड,अमरदिप पारखी, डॉ.ज्योति डांगे, शंकर संगमवार,त्रिरत्ना मेश्राम,व ज्योति तामगाडगे यांच्यासह आंदोलनात उतरलेल्या शेकडों अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा आज रविन्द्र उमाठे यांनी दिला आहे.
