Home Breaking News Chimur taluka@ news • चिमूर येथे श्री साई मूर्ती स्थापनेचा नववा वर्धापन...

Chimur taluka@ news • चिमूर येथे श्री साई मूर्ती स्थापनेचा नववा वर्धापन दिंन साजरा.

157

Chimur taluka@ news
• चिमूर येथे श्री साई मूर्ती
स्थापनेचा नववा वर्धापन दिंन साजरा.

✍️शार्दूल पचारे
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, चिमूर

चिमूर येथील साई नगर येथे श्री साईबाबा यांच्या मूर्ती स्थापनेचा नववां वर्धापन दीन नुकताच साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला
श्री साई देवस्थान संस्थान साई नगर वडाळा पैकु येथे श्री साई मूर्ती स्थापना नववा वर्धापण दीन नुकताच साजरा करण्यात आला. सकाळी ५ वाजता साफ सफाई करून साई बाबा मूर्तीचे अभ्यंग स्नान करण्यात आले. अभ्यंग स्नान नंतर प्रमोद भोपे महाराज यांचे हस्ते होम हवन कार्यक्रम संपन झाला. श्री गुरुदेव ग्राम विकास मंडळ इंदिरा नगरच्या वतीनं ध्यान साधना व सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. रुकुडगिर देवस्थान संस्थानच्या वतीने भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चिमूर शहरातून साई पालखीची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली यामधे श्री सत्संग भजन मंडळ. साई महिला भजन मंडळ. लक्ष्मी महिला भजन मंडळ. गुरुदेव महिला भजन मंडळ. मंजुळा माता महिला भजन मंडळ यांनी सहभाग घेतला होता. कला व महाप्रसादांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला