Chandrapur dist@ news
• आयटकच्या वतीने मोदी हटाव -देश बचाव जनजागरण संघर्ष यात्रेला प्रारंभ
• जणजागरण महासंघर्ष यात्रेचे येत्या १४ डिसेंबरला चंद्रपूरात आगमन; विराट मोर्चाचे ही आयोजन
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज)
चंद्रपूर : किरण घाटे(सहसंपादक)
कामगार, किसान,भूमिहीन, व सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात मोदी हटाव, देश बचाव,संविधान बचाव,हा नारा देत राज्यव्यापी महासंघर्ष जनजागरण यात्रा 20 नोव्हेंबर 2023 पासून महाराष्ट्र आयटकच्या वतीने कोल्हापूर येथून सुरू झाली असून ती संघर्ष यात्रा येत्या 14 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथे येत आहे . उपरोक्त रॅलीचे स्वागत करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा आयटक कौन्सिलची नियोजन बैठक आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ.दिलीप बर्गी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त खदान मजदुर संघ कार्यालय बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक, कॉ.एन. टी.म्हस्के राष्ट्रीय कौन्सिल सदस्य आयटक, संयुक्त खदान मजदुर संघाचे कॉ.जियाउल्ला खान , कॉ.दिलीप कणकुलीवार, कॉ.एस.एस. काशीवार,जे.के.जेकब, आर.एम. जुपाक्का, ए.एन.सपाटे, कॉ.प्रदीप चीताडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ.रवींद्र उमाटे,जिल्हा सचिव कॉ.प्रकाश रेड्डी,किसान सभेचे कॉ.राजू गैनवार,एम.एस. ई.बी. वर्कर्स फेडरेशनचे कॉ.प्रकाश वानखेडे, कॉ.संजय नागापुरे, आशा वर्कर गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या कॉ.सविता गटलेवार,प्रमिला बावणे,शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन च्या जिल्हा सचिव कॉ.वनिता कुंठावार,श्रीधर वाढई,कल्पना रायपुरे,अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या लता लेनगुरे,मनिषा गावंडे,विद्या वासेकर,वंदना खेडकर,अशोक यादव,गिरीश शास्त्रकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. संयुक्त खदान मजदुर संघ संलग्न आयटक कार्यालय डी .आर. सी.हेल्थ क्लब बल्हारपूर बायपास रोड बंगाली कॅम्प येथून विराट बाॅईक रॅली काढून चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गानी फिरत ती जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पोहचणार आहे .
तद्वतच याच दिवशी सकाळी 11 वाजता आझाद बगीचा जवळून एक विराट निघणार आहे.ह्यात हजारों कामगारांचा सहभाग राहणार असून तो विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय समोर धडकणार आहे. दुपारी 1वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर एका जाहीर सभेचे आयोजन केले असून या सभेला आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉ.श्यामजी काळे, कॉ.बबली रावत, कॉ.राजू देसले,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.अँड सुभाष लांडे यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते व विविध कामगार संटनेचे पुढारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . दुपारी 3 वाजता सावली येथे बस स्टँड समोर सभा घेऊन जन संघर्ष रॅली गडचिरोलीकडे रवाना होणार आहे . चंद्रपूर जिल्ह्यातील,कामगार,कर्मचारी,शेतकरी शेतमजूर, विध्यार्थी ,युवक,बेरोजगार यासह सर्व जनतेनी हजारोंच्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी केले आहे
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य कौन्सिल यांच्या वतीने राज्यव्यापी महासंघर्ष जनजागरण यात्रा २0 नोव्हेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत होत असून कोल्हापूर ते नागपूर पर्यंत हा प्रवास होणार आहे शेवटच्या दिवशी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर दि. 18 डिसेंबर रोजी एक लाख कामगार ,कर्मचारी,शेतकरी , शेतमजुरांनाचा विराट मोर्चा काढून मोदी सरकार चले जाव ची घोषणा करणार असल्याची माहिती आयोजकांनी चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीस दिली आहे.
