Home Breaking News Chandrapur dist@ news • जिवन तोगरे हत्या प्रकरण ! अजुनही पिडीत कुटुंबांतील...

Chandrapur dist@ news • जिवन तोगरे हत्या प्रकरण ! अजुनही पिडीत कुटुंबांतील सदस्य न्यायाच्या प्रतीक्षेत

224

Chandrapur dist@ news
• जिवन तोगरे हत्या प्रकरण ! अजुनही पिडीत कुटुंबांतील सदस्य न्यायाच्या प्रतीक्षेत

सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)
चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम जिवती तालुक्यातील रुग्णसेवक म्हणून नावलौकिक झालेल्या तरुणाची 1 जुन 2023 ला हत्या झाली. त्याच्या 4 दिवसानंतर 4 जुनला मृतदेह मरकागोंदी शेतशिवरात आढळून आला होता.
हत्येला दोन महिने उलटल्यानंतर देखील त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही त्यामुळे त्यांनी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरा समोर 27 दिवस आंदोलन केले होते.
या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांना चौकशीसाठी निवेदन देण्यात आले होते. पण अजून ही या गरीब कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळाला नाही.दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील याच बाबतीत निवेदने सादर करण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे.पण अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही हे खरे वास्तव आहे.आज या घटनेस तब्बल 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊनही देखील या प्रकरणातील खरे आरोपी मिळाले नाही .जिवन तोगरे यांची हत्याच झाली होती असे तोगरे परिवारातील सदस्यांचे म्हणणे आहे.