Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूरात कॅंसर तपासणी शिबिराचे आयोजन;अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ !

Chandrapur dist@ news •चंद्रपूरात कॅंसर तपासणी शिबिराचे आयोजन;अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ !

38

Chandrapur dist@ news
•चंद्रपूरात कॅंसर तपासणी शिबिराचे आयोजन;अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ !

सुवर्ण भारत
चंद्रपूर:किरण घाटे

टाटा कॅन्सर केअर फाॅऊंडेशन व रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने कॅन्सर तपासणी शिबीराचे आज चंद्रपूर शहरात आयोजन करण्यात आले होते . सदरहु शिबिराचे उद्घाटन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी रेडक्रॉसचे डॉ.संजय घाटे, टाटा ट्रॅस्टच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक डॉ .आशिष बारब्दे, जिल्हा समन्वयक सूरज साळुंके, डॉ. ट्विंकल ढेंगळे यांनी शिबिरात उपस्थित लोकांची तपासणी केली .या शिबिरात 300 लोकांची तपासणी करण्यात आली. मुख्यता सदरहु आयोजित शिबिरात मुख कर्करोग, स्तन कर्करोग, व गर्भाशय मुखाची तपासणी करण्यात आली.