Chandrapur city@ news
• विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सुवर्ण भारत(सहसंपादक)
चंद्रपूर :किरण घाटे
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळेला आम आदमी पक्षाचे नेते सुनील मुसळे यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांना माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार मिळवून दिला. कामगारांपासून तर स्त्रिया पर्यंत सर्व अधिकार संविधानात तरतूद करून जगाला हेवा वाटावा असे उत्तम संविधान त्यांनी या देशाला दिले. या महामानवाचे उपकार मानावे तेवढे कमीच आहे . निव्वळ देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये या महामानवाला मानणारे अनुयायी पाहायला मिळतात. बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती काम करत असून येणारा काळ हा सुशिक्षित युवा वर्गांचा असेल असे मत मयुर राईकवार यांनी व्यक्त केले.या वेळी वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, नागसेन लाभाने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.