Home Breaking News Ballarpur city @news •भूमिगत विद्युती केलेल्या कामाची तत्काल चौकशी करा:प्रशांत झामरे

Ballarpur city @news •भूमिगत विद्युती केलेल्या कामाची तत्काल चौकशी करा:प्रशांत झामरे

64

Ballarpur city @news

•भूमिगत विद्युती केलेल्या कामाची तत्काल चौकशी करा:प्रशांत झामरे

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपूर: शहरात नगरपरिषदे कडून करण्यात आलेल्या भूमिगत विद्युती करणाचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे असून. अनेक ठिकाणी विद्युत वाहनांचे तार हे जमिनीच्या बाहेर आलेले आहे त्याच प्रमाणे रिस्टोरेशनचे काम सुद्धा चुकीचे झालेले आहे. काम सुरू असताना नगरपरिषदेच्या अधिकारी त्याच्याकडे दूरलक्ष केले. बऱ्याच ठिकाणी काँक्रिटीकरनाचे काम हे फक्त दोन-तीन इंच केलेले आहे व खड्डे तीन फूट खोदायला हवे होते ते सुद्धा त्यांनी एक-दीड फूट खोदूले व खोदल्यानंतर त्यात पी.सी.सी. सुद्धा करण्यात आलेली नाही. यामुळे जीवित हानी होण्याची फार मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. जर का हे काम लवकरात लवकर सुरडीत केले नाही तर भारतीय टायगर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व याची सविस्तर जबाबदारी नगरपरिषद बल्लारपूर ची असेल. अशी माहिती भारतीय टायगर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झांमरे यांनी दिली. निवेदन देत असताना भारतीय टायगर संघटनेचे दर्शन मोरे सुरज चौबे रतन फुलकर समीर खान मनोज बालमवार उपस्थित होते.