Chandrapur city@ news
• राज्यातील तब्बल १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा १४ डिसेंबर पासून बेमुदत संप प्रारंभ!
सुवर्ण भारत
चंद्रपूर: किरण घाटे(सहसंपादक)
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात शासन आश्वासने देतात परंतु मागण्या मान्य करत नाही त्याअनुषंगाने सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर च्या वतीने जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करा व इतर 17 मागण्यांबाबत शासनाला ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी-शिक्षकांनी आज दि.14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाचे शस्त्र हातात घेतले आहे.
नवीन पेन्शन योजनेमुळे गेली १७ वर्षे राज्यातील कर्मचारी-शिक्षक नाडले गेले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे भविष्यच उध्वस्त झालेले आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना (OPS) सर्वांना लागू करा, शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करणे बंद करा, शैक्षणिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे बंद करा, आरोग्य विभागातील अनेक रिक्त पदे तात्काळ भरा यासह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी माझे कुटुंब, माझी पेन्शन या शीर्षाखाली १८ मागण्यांच्या आग्रहासाठी दि. १४ डिसेंबर २०२३ पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर असणार आहे.
या संपात महसूल विभाग, कोषागार कार्यालय, कृषि विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, आरटीओ कार्यालय, GST विभाग , पोलीस अधिक्षक कार्यालय, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, शासकीय तंत्र निकेतन, भूवैज्ञानिक व खानिकर्म विभाग, व इतर सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांचा सहभाग आहे.