Home Breaking News Mul taluka @news •वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, मूल तालुक्यातील घटना

Mul taluka @news •वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, मूल तालुक्यातील घटना

75

Mul taluka @news
•वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, मूल तालुक्यातील घटना

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल तालुक्यातील बोरचांदली येथे वाघाने गुराख्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली. जखमी झालेल्या गुराख्याचे नाव महादेव राऊत वय 55 राहणार बोरचांदली असे आहे.

उमा नदीच्या नवीन पुलाच्या परिसरात गुरे चारण्याकरिता नेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने महादेव याच्यावर हल्ला करून कानाला आणि हाताला गंभीर जखमी केले आहे.

जखमी झालेल्या महादेव याचा प्राथमिक उपचार मूल उपजिल्हा रुग्णालयात करून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.