Mul taluka@ news
•विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, मूल तालुक्यातील घटना
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
मूल:आपल्या शेतात जाणार्या शेतकऱ्याचा दुसऱ्याच्या शेतात लावलेल्या विजेचा जबर धक्का बसला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी तालुक्यातील उसराळा येथे घडली. देविदास इस्टाम वय वर्षे 40 असे मृतकाचे नाव आहे.
देविदास हे वडिलांच्या नावे असलेली शेती करीत होते. शेतात पीक उभे असल्याने ते पाहण्यासाठी शेतात जात होते. त्याच मार्गावर असलेल्या दुसऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात पीक वन्यप्राण्यांच्या उपद्रव्यापासून वाचवण्यासाठी शेताच्या सभोवताल लावलेल्या तारेच्या कुंपणाला विद्युत करंट लावून ठेवले होते, ही बाब देविदास च्या लक्षात आली नाही. कुंपणास स्पर्श झाल्याने विजेचा जब्बर धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी, दोन मुले, आणि आई असा परिवार आहे.