Home Breaking News •कोरपना येथे अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे ठिय्या आंदोलन सुरुच ! •येत्या...

•कोरपना येथे अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे ठिय्या आंदोलन सुरुच ! •येत्या १५ तारखेला नागपूरात विराट मोर्चा! •मूल तालुक्यातीलही शेकडों अंगणवाडी सेविका होणार मोर्चात सहभागी

211

•कोरपना येथे अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे ठिय्या आंदोलन सुरुच !
•येत्या १५ तारखेला नागपूरात विराट मोर्चा!
•मूल तालुक्यातीलही शेकडों अंगणवाडी सेविका होणार मोर्चात सहभागी

सुवर्ण भारत
चंद्रपूर :किरण घाटे(सहसंपादक)

आपल्या न्याय मागण्यां पदरात पाडून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे धरणे आंदोलन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यातही शेकडों अंगणवाडी सेविका व मदतनिस या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून त्या आपल्या रास्त मागण्यांसाठी लढा देत असून अद्यापही त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याचे दिसून येत नाही.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १५ तारखेला नागपूरात एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यांतून शेकडों अंगणवाडी सेविका व मदतनिस या मोर्चात सहभागी होत असल्याची माहिती या संघटनेच्या पदाधिकारी गुजाताई डोंगे,विमल जेणेकर,शोभा काकडे, कल्पना मांदाडे,रेखा वरारकर, निर्मला इटनकर, मंगला खडसंग उषा खिरटकर, माधूरी भांडारकर, प्रतिभा निब्रड ,वर्षा खाडे आदिंनी काल कोरपना मुक्कामी दिली.मूल मध्ये ही अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे धरणे आंदोलन सुरू असून उद्या होत असलेल्या मोर्चात मोठ्या संख्येंने अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी होत असल्याचे पोर्णिमा किर्तीवार यांनी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन बोलताना सांगितले.