Chimur taluka@ news
•नेरी येथील पी.एच.सी.चौक अतिक्रमणाच्या विळख्यात
✍️ शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी चे प्रवेशद्वार म्हणून पी एच सी चौक ओळखला जातो येथील रस्त्याचे बांधकाम सुरू आहे मात्र रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणाचा रस्ता बांधकामाला अडचण निर्माण झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संरक्षण भिंतीला लागून अतिक्रमण धारकांनी पक्के घरे बांधल्याने रस्ता अरुंद झाला असून आहे तेवढाच बांधकाम केला तर या मुख्य चौकात भविष्यात अपघात होणार असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे तसेच येणाऱ्या काळात याच चौकात सोंदर्गीकरण होणार आहे मात्र अतिक्रमण असल्याने जागेची अडचण निर्माण होणार आहे सदर बाबतीत ग्रामपंचायत नेरीला कळविले आहे मात्र ग्रामपंचायत डोळे बंद करून दुर्लक्ष करीत आहे तेव्हा तात्काळ अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमण काढावे आणि रस्ता बांधकाम सुरळीत करावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
पी.एच.सी. चौक हे नेरी, चिमूर, सिंदेवाही, जाभुळघाट या गावांना जाणारा मुख्य चौरस्ता आहे या ठिकाणी खूप मोठी जागा असून नागरिकांनी आपले व्यवसायाचे प्रतिष्ठाने उभी केली आहेत पुढील काही वर्षात या चौकात सोंदर्यकरण होणार आहे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सरंक्षण भिंतीला लागून काही अतिक्रमण धारकांनी घरे उभे केले आहे त्यामुळे रस्त्याला अडचण निर्माण झाली आहे तसेच सदर अतिक्रमण हटविण्यासाठी मागील पंचवार्षिक मध्ये ग्रा प ने पुढाकार घेतला होता.
मात्र अतिक्रमण धारकाने न्यालायत स्थगिती आदेश आणला होता तेव्हा ग्रा .प नेन्यायालयात कागदपत्रे सादर करून स्थगिती उठवून अतिक्रमण उठवण्याचे
अधिकार न्यायालयाने ग्रा प ला दिले मात्र तरीपण अतिक्रमण हटविण्यात आले.
नाही अशी माहिती नागरिकांनी दिली रस्ता सुंदर बनून सोंदर्यकरण व्हावे अशी नागरिकांनी मनोगत व्यक्त केले आहे पण ग्रा प याकडे दुर्लक्ष करताना दिसत
आहे रस्ता अरुंद बनला तर येणाऱ्या काळात अपघात तर होणारच परंतु त्या ठिकाणी जागा पण शिल्लक राहणार नाही त्याचे विपरीत परिणाम येणाऱ्या
पिढीला भोगावे लागतील तेव्हा ग्रा प ची असलेली जागा ग्रा प ने पुढाकार घेऊन तात्काळ कारवाई करून अतिक्रमण काढावे अशी मागणी नागरिकांनी केली
आहे.