Chandrapur dist@ news
•चिमूर व चंद्रपूर येथील अन्नत्याग आंदोलनाला आले यश.
• १० पैकी ८ मागण्या मंजूर..
✍️शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सामाजिक न्याय भवनात बैठक संपन्न झाली. संघटनेच्या १० पैकी ७ मागण्या मान्य करण्यात आल्या .
उर्वरीत मागण्यासंबंधीदेखील लवकरच सकारात्मक निर्णय घेत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची आधार योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक कर्जासंबंधी तरतूद, विश्वकर्मा योजना, महाज्योती योजना यासंबंधीच्या मागण्या सदर बैठकीत मान्य करण्यात आल्या. शिक्षण, उद्योग विश्वास प्रगतीची आस असलेल्या ओबीसी बांधवांकरिता ही मोठी आनंददायी बाब आहे. सर्वांचे अभिनंदन.
या बैठकप्रसंगी माजी मंत्री डॉ परीनय फुके,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, सहसचिव शरद वानखेडे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे , युवा अध्यक्ष सुभाष घाटे , विद्यार्थी अध्यक्ष श्वृषभ राऊत , परमेश्वर राऊत, रामदास कामडी,श्रीहरी सातपुते , ओबीसी योध्दा रविंद्र टोंगे ओबीसी सचिव सौ. वनिता वेद सिंहल , ‘महाज्योती’ चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर रात्री उशिरा डॉ बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजूरकर यांचे हस्ते चिमूर येथील दिनांक ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू असलेले अक्षय लांजेवार , व अजित सुकारे यांच्या अन्नत्याग आंदोलन निंबू शरबत पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली या वेळी चिमुरात असंख्य कार्यकर्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.