Home Breaking News …..अखेर त्या अतिक्रमित जमिनींच्या मोजणीला सुरुवात …भाग्यश्री आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश,शेतकऱ्यांना...

…..अखेर त्या अतिक्रमित जमिनींच्या मोजणीला सुरुवात …भाग्यश्री आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश,शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

82

…..अखेर त्या अतिक्रमित जमिनींच्या मोजणीला सुरुवात

…भाग्यश्री आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश,शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:सहसंपादक

अहेरी:-तालुक्यातील पेरमिली परिसरातील शेतकऱ्यांची अतिक्रमित जमिनीला मालकी हक्क मिळाला नसल्याने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेतल्याने अखेर अतिक्रमित शेत जमीन मोजणीला सुरुवात झाली आहे.

अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील शेतकरी २००५ पूर्वी पासून वनजमिनिवर अतिक्रमण करून शेती करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मालकी हक्क मिळाला नसल्याने त्यांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला.मात्र,त्यांना अपयश आल्याने येथील शेतकऱ्यांनी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शेतजमिनी मोजमाफ करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे.नुकतेच या परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमित शेतजमिनीच्या मोजमाफ कामाला सुरूवात करण्यात आले आहे. वनहक्क समिती,महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी स्वतः संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोजमाफ कामकाजाची पाहणी केली तर आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना या कामात मदत करण्याचे निर्देश दिले.त्यामुळे शेतजमिनी मोजमाफच्या कामाला अधिक गती मिळाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, तलाठी कु.पुजा मडावी,वनरक्षक देव लेकामी,कोतवाल वासुदेव कोडापे,वारलु आत्राम,वन कर्मचारी संतोष मेश्राम,वन हक्क समितीचे अध्यक्ष देवराव मडावी,वन हक्क समितीचे सचिव शंकर कुंभारे तसेच सत्यनारायण येगोलोपवार, देवाजी सडमेक, बंडु दहागावकर,महेश चांदेकर, नारायण मडावी, संतोष मडावी, तिरुपती कोसरे, रुपेश हजारे, सुरेश हजारे, कारू दहागावकर, माधव दहागावकर, रुसी चांदेकर, प्रणय दहागावकर, रामचंद्र चांदेकर, गोपाळ पोटदुखे, सदु सडमेक, गणपत आतकुलवार, बापु औतकर, ललिता चांदेकर, कोंडू दहागावकर, विश्वनाथ हजारे, विलास दहागावकर, लक्ष्मण मडावी, राजु आत्राम इत्यादी उपस्थित होते.