Ballarpur city@ news
•केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्याला होतोय कडाडून विरोध
•अन्यायकारक कायदा असल्याचा वाहन चालकांनी केला आरोप!
•उद्या पासून वाहतूक बंद ठेवण्याचा घेतला निर्णय
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
बल्लारपूर :- केंद्र सरकारने नवा मोटार वाहन कायदा तयार केला. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करून लोकल ट्रान्सपोर्ट वेल्फेअर सोसायटी वाहनचालकांनी उद्या ३ जानेवारी पासून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान संघटनांनी सोमवारी आंदोलन केले. पंतप्रधान भारत सरकार यांना पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्फत एक निवेदन देऊन हा कायदा रद्द करण्याची मागणी केली .
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. या तरतुदीला वाहनचालक संघटनांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
सदरहु काळया कायदयाच्या विरोधात वाहन चालकांमध्ये तिव्र संताप आहे. वाहन चालकावर अन्याय करणारा जुलमी अत्याचारी नविन मोटार वाहन कायदा रद्द करावा दुचाकी वाहने, आटो चालक, ट्रॅक्टर चालक, काळी-पिवळी जिप चालक व ट्रक चालविणा-या चालकाला वाहन चालविण्यास भीती वाटत आहे करीता उद्या दि. ३ जानेवारी पासुन सर्व वाहन बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन देताना लोकल ट्रान्सपोर्ट वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष नरेश मुंदडा, ऑटो संघटनाचे शेख अब्बास भाई, महेश दरक सूरज भारद्वाज श्रीकांत खलील भाई इरफान भाई राजू गवली उपेन्द्र यादव, प्रदिप, अभीमान, छेदीलाल, मोहीत, विजय, सूधिर यादव, बिहारी,अशोक, जयप्रकाश, राम सुरेश साहू, लाला साहू, बापुराव कोरडे, अमोल कोडापे सह आदी वाहन, ऑटो चालक उपस्थित होते.